रोहित शर्मा राजकारणात करणार एन्ट्री? CM फडणवीसांची भेट नेमकी कशासाठी?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी निवृत्तीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्माची भेट घेतली. त्यामुळं क्रिकेटसह राजकीय वर्तुळात रोहित शर्मा राजकारणात एन्ट्री करणार असी चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे रोहितदेखील आता राजकारणात बॅटींग करणार या चर्चेला उत आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्माने त्यांची भेट घेतल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. यावेळी त्यांनी “टीम इंडियाचा क्रिकेटर रोहित शर्मा याचं माझ्या शासकीय निवासस्थानी स्वागत. रोहितला भेटून आणि त्यासोबत बोलून मला आनंद झाला. मी रोहितचं कसोटी क्रिकेटमधील योगदानसाठी अभिनदंन केलं आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या”, अशा आशयाची कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे. मात्र, भेटीचं कारण गुलदस्त्यात ठेवलं आहे. त्यांची भेट नेमकी कशासाठी होती? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हेही वाचा – राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; म्हणाल्या, “भाजपात जाण्याबाबत…”
दरम्यान, वानखेडेवर रोहित शर्माच्या नावाचे स्टॅड उभारण्यात आलं आहे. या स्टॅडचे उद्या उद्घाटन आहे. यासंदर्भात रोहिते मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
रोहितने आयपीएलच्या 18 व्या मोसमाची धामधुम असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. रोहितने इंस्टा स्टोरीतून निवृत्त होत असल्याची माहिती क्रिकेट चाहत्यांना दिली होती.
काही दिवसांपूर्वी केदार जाधव याने मुंबईत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला होता. तसेच टीम इंडियाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे देखील भाजपचे लोकसभा खासदार राहिले आहेत. तसेच युसूफ पठाण, कीर्ती आझाद, नवज्योत सिंह सिधू, मोहम्मज अझहरुद्दीन यासारख्या अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला आहे.