IND vs NZ: न्यूझीलंडविरूद्धच्या टी-२० सामन्यात हार्दिक देणार ‘या’ खेळाडूंना संधी?
![Will Hardik give 'these' players a chance in the T20 match against New Zealand?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/hardik-pandya-780x470.jpg)
पृथ्वी, ऋतुराज, जितेश शर्मा या खेळाडूंना भारतीय संघात संधी
मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता झारखंड स्टेट क्रिकेट असोसएशन मैदानावर होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाची कमान हार्दिक पांड्याकडे असणार आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व मिचेल सँटनरकडे आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये हिटमॅन रोहित शर्मा आणि विराट कोहली या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश नसल्याने युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ज्यामुळे भविष्यात प्रत्येक फॉरमॅट मध्ये एक चांगला संघ उभा राहू शकतो. युवा खेळाडूमध्ये आज पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, जितेश शर्मा या खेळाडूंना संधी मिळू शकते.
भारताचा आजच्या सामन्यासाठी संभाव्य संघ :
पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुड्डा, उमरान मलिक, शिवम मावी, कुलदीप यादव, जितेश शर्मा, अर्शदीप सिंह.
न्यूझीलंडचा आजच्या सामन्यासाठी संभाव्य संघ :
फिन एलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, माइकल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्यूसन, जॅकब डफी, हेनरी शिपले, ब्लेयर टिकनर, मायकल रिपन, डेन क्लिव्हर, ईश सोढी.