Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान विभागाने दिली माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Maharashtra-Monsoon-780x470.jpg)
पुणे | संपूर्ण महाराष्ट्र उकाड्याने हैराण झाला आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच रेमल वादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग आला असून लवकरच मान्सून महाराष्ट्रत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
येत्या १० किंवा ११ जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून १५ जूनपासून मान्सून महाराष्ट्रात धुमाकूळ घालेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘पुणे पोर्श अपघात प्रकरणी जलदगती न्यायालयात वर्ग करा’; ॲड. संदीप चिंचवडे
अशातच हवामान खात्याने पुढील एक ते दोन दिवस विदर्भात तापमान वाढीची शक्यता वर्तवली आहे. या काळात कमाल तापमान ४४ ते ४९ अंशापर्यंत वाढण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.