‘व्हॉट्सअॅप’ मध्ये आता इलेक्ट्रॉन बेस्ट असलेले डेस्कटॉप अॅप
मॅक डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी नवीन कॅटॅलिस्ट ॲपवर करावे लागेल स्विच
![WhatsApp, Electron, Best, Desktop, App, use, new, catalyst, switch,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/whatsapp-780x470.jpg)
मुंबई : जगभरात इंस्टेट मेसेजसाठी व्हॉट्सअॅप हे अॅप वापरले जाते. कोट्यवधी युजर या अॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपकडूनही आपल्या युजरसाठी नवनवीन फिचर्स आणि अपडेट दिले जातात. व्हॉट्सअॅपचे अपडेट मोबाईल युजरसोबत डेस्कटॉप युजरलाही मिळतात. आता कंपनी आपल्या युजर्ससाठी बदल केला आहे. त्याचे जुने अॅप बंद होणार आहे.
अन्यथा होणार नुकसान
तुम्ही Apple Mac युजर्स असतील तर व्हॉट्सअॅपचे अपडेट जाणून घेणे महत्वाचे आहे. तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जुना डाटा जाणार आहे. तुमचा पर्सनल डाटाही जाणार आहे. तसेच तुमची प्रायव्हेसी ब्रीच होऊ शकते. कारण व्हॉट्सअॅप आता इलेक्ट्रॉन बेस्ट असलेले डेस्कटॉप अॅप आणत आहे.
जुने अॅप बंद होणार
जुने अॅप बंद होणार असल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आता जुन्या सिस्टीमवर व्हॉट्सअॅपला सपोर्ट मिळणार नाही. मेटाने पुष्टी केली आहे की व्हॉट्सअॅप आता मॅकओएस ॲपमध्ये चालणार नाही. नवीन अपडेटमुळे ॲपमध्ये WhatsApp चालणार नाही. WABetaInfo ने X वर त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये कंपनी म्हटले आहे की, मॅकवरील इलेक्ट्रॉन ॲप 54 दिवसांनंतर काम करणार नाही. मॅक डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी नवीन कॅटॅलिस्ट ॲपवर स्विच करावे लागेल. नवीन ॲपवर स्विच करताना, चॅट किंवा कॉन्टॅक्ट लिस्टचा डेटा सेव्ह केला जाईल.
नवीन अॅप डाउनलोड करा
मेटानुसार macOS युजर्स व्हॉट्सअॅप वेबसाइटवरुन नवीन अॅप डाउनलोड करु शकतात. तसेच मॅक अॅप स्टोरवरसुद्धा नवीन व्हर्जन उपलब्ध आहे. ते डाउनलोड करुन त्याचा वापर करु शकतात. निर्धारित वेळेपूर्वी तुम्हाला हे नवीन व्हॉट्सअॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. कॅटॅलिस्ट ॲप युजरला अधिक चांगली कामगिरी आणि सुरक्षा देणार आहे. यामध्ये युजर्सला Mac OS चे फीचर्स मिळणार आहे.