“सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?”- भाजपा
!["What did Sachin Waze reveal that Sharad Pawar suddenly started having stomach ache?" - BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Sharad-pawar-770x433.jpg)
पुणे |
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. बुधवारी पवारांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. पवारांच्या प्रकतीबाबतचं वृत्त समजताच राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शरद पवारांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा व्यक्त केल्या. यामध्ये लता मंगेशकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा अनेक दिग्गजांचा समावेश होता. पवारांनीही ट्विट करत प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
पण, अशात दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी शरद पवारांवर टीका केली. त्यांनी पवारांच्या पोटदुखीच्या त्रासाचा संबंध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात एनआयएने अटक केलेल्या सचिन वाझेंसोबत जोडला. अटक केल्यापासून वाझे दररोज नवनवीन खुलासे करत आहेत. यावरुन बोलताना जिंदल यांनी पवारांवर निशाणा साधला. “सचिन वाझेने एनआयएसमोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. आता तर असं वाटतंय की…दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है”, असं ट्विट नवीन कुमार यांनी केलं. याशिवाय, “पवारांच्या अचानक पोटदुखीमुळे पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल असं का वाटतंय” असंही कुमार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं.
सचिन वाजे ने NIA के सामने अब ऐसा क्या खुलासा कर दिया की शरद पवार अचनाक को इतना तेज पेट दर्द हुआ की उन्हें हॉस्पिटल में भर्ती होना पड़ा है अब तो ऐसा लग रहा है की दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है। #महाराष्ट्र_सरकार
— Naveen Kumar Jindal 🇮🇳 (@naveenjindalbjp) March 29, 2021
शरद पवार के पेट में अचानक दर्द होने की खबर से ऐसा क्यों लग रहा है कि बंगाल से पहले खेला महाराष्ट्र में होने वाला है।
— Naveen Kumar Jindal 🇮🇳 (@naveenjindalbjp) March 29, 2021
दरम्यान, शरद पवार हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता ३१ तारखेला शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.