महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या कुठे कुठे हवामान विभागाचा हायअलर्ट
![Warning of heavy rain in Maharashtra, know where and where high alert of Meteorological Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Maharashtra-Rain-780x470.jpg)
Maharashtra Rain | हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यात आहे. पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यात हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबईत पुढील २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान ढगाळ राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
हेही वाचा – पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील २४ तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील २४ तासांसाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.