#Waragainstcorona: भाजपाच्या नेत्यांनी विकृत चाळे करु नये: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (व्हीडिओ)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/2-16.jpg)
– वांद्रे येथील घटनेवर राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेवर आक्षेप
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
परराज्यातील मजुरांना गावी जाता यावे म्हणून रेल्वे विशेष गाड्या सोडणार असल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे वांद्रे स्टेशनबाहेर झालेल्या मजुरांची गर्दी झाली. कोरोनाजन्य परिस्थिती असताना अशाप्रकारे जमाव निर्माण झाला. स्थलांतरित कामगारांना राज्य सरकार मदत करु शकत नाही. सरकार कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यात अपयशी ठरत आहे, असा आरोप करीत विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांकडून सोशल मिडियाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होवू लागली.
याबाबत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच भाजपा नेत्यांना सुनावले आहे. भाजपाने अशाप्रकारे एखाद्या संवेदशनशील घटनेचे राजकारण करु नये. आपले विकृत चाळे थांबवावेत, असेही वागळे यांनी म्हटले आहे.
पहा संपूर्ण व्हीडिओ…