breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे अपघात प्रकरण : विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवालला १४ दिवसांची न्यानलयीन कोठडी

पुणे | पुणे अपघातप्रकरणात मूळ आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिल आणि आजोबांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पुणे जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, अल्पवयीन चालकाला बालसुधारगृहात ५ जूनपर्यंत ठेवण्यात आलं आहे. तो अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात ठेवलं आहे. परंतु, त्याची चौकशी करता यावी याकरता पुणे पोलिसांनी परवानगी मागितली आहे.

या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे या तीन आरोपींना काल (३० मे) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी आणि बचाव पक्षाकडून युक्तीवाद झाला. त्यावेळी तिन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्या मागणीला बचाव पक्षाच्या वकिलांनी विरोध दर्शविला. मात्र त्यावर न्यायालयाने तिघा आरोपींना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा    –      पुणेकरांना दिलासा, महापालिकेकडून सवलतीत मिळकतकर भरण्यासाठी मुदतवाढ 

या प्रकरणात आरोपीच्या आईचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे. १७ वर्षीय आरोपीच्या आईने मुलाचे रक्त नमुने बदलण्यासाठी स्वतःचे रक्त ससून रुग्णालयाला दिले असल्याचे समोर आले आहे. रक्त नमुने बदलण्यामध्ये डॉ. श्रीहरी हळनोरचा प्रमुख सहभाग होता. हळनोरनेच आईचेही रक्त नमुने घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, ज्यावेळी रक्त चाचणी घेण्यासाठी रक्त घेतले गेले, तेव्हा आरोपीची आई रुग्णालयात हजर होती. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या अटकेनंतर त्या बेपत्ता झाल्या आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button