ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावंतवाडी येथे गावसहभागी मूल्यावलोकन शिबिर उत्साहात

शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य अभ्यासक्रमांतर्गत उपक्रम

कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ रूरल डेव्हलपमेंट अधिविभागाच्या समाजकार्य अभ्यासक्रमांतर्गत गावसहभागी मूल्य वलोकन शिबिर कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी (गर्जन ग्रामपंचायत) येथे उत्साहात पार पडले. 9 ते 14 ते ऑक्टोबर दरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांर्तगत समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी गावचा सूक्ष्म अभ्यास करून गावच्या विकासास उपयुक्त कार्यक्रम राबवले.

शिबिराची सुरुवात मशाल फेरीने झाली. या मशाल फेरीमध्ये विद्यामंदिर सावंतवाडी येथील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर ग्राम बैठकीमध्ये या शिबिराचा उद्देश ग्रामस्थांना सांगण्यात आला. शिवार फेरीच्या माध्यमातून शेती, पिके, मृदा याच्या माध्यमातून शेती आणि समस्यांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक/युवती, शेतकरी गटांसोबत चर्चा, गावातील विविध सहकारी संस्थांना भेटी, गाव नकाशे, संसाधनाचे नकाशे समस्या अभ्यासून त्यावर सविस्तर चर्चा आणि उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विदयार्थांसोबत प्रभात फेरी , वृक्षारोपण , विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या शिबिराचा घोषवारा वाचन ग्रामसभेमध्ये करण्यात आले.

या शिबिराच्या समन्वयक डॉ. उर्मिला दशवंत, गावातील प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अर्जून तांदळे, शिक्षक दिपक दगरखैर, ग्रामपंचायत सदस्य जग्गनाथ सावंत, विठ्ठल सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत सावंत, ज्योती सावंत, रेश्मा सावंत, प्रदीप सावंत, मोहन सावंत, मारुती सावंत, बंडू सावंत ,अंगणवाडी सेविका सुनंदा नाईक आणि सर्व ग्रामस्थ यांनी हे शिबिर आयोजन करण्यासाठी सहकार्य केले.

शिबिरात यांचा सहभाग…
या शिबिरात प्रिती कांबळे, शाहीन पाटील, स्वाती राऊत, आश्विनी खोत , योगिता मस्कर , पायल कांबळे, प्रेम भोसले, स्वप्निल बारवाडे, गौरव दाभाडे हे समाजकार्याचे विद्यार्थी सहभागी झाले. या शिबिराची सांगता ग्रामसभेने करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button