breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Viacom-18 ने जिंकले महिला IPL चे मीडिया हक्क; 951 कोटींचा करार

मुंबई : महिला इंडियन प्रीमियर लीग यंदा होणार आहे. त्यासाठी माध्यम हक्कासाठी लिलाव प्रक्रिया पार पाडली. यात Disny + Star, Sony-Zee आणि Viacom 18 हे त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी बोली लावण्यात आघाडीवर होते. ज्यामध्ये Viacom 18 ने यशस्वी बोली लावून मीडिया अधिकारांचे अधिकार संपादन केले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अधिकृतपणे याची माहिती दिली आहे.
अधिकृत घोषणेची पुष्टी करताना, बीसीसीआयने या कराराची माहिती दिली. पुढील पाच वर्षांसाठी ९५१ कोटींचा करार झाला आहे. याआधी पुरुषांच्या आयपीएलच्या मीडिया हक्कांमधून बीसीसीआयने जवळपास ४८,३००+ कोटी कमावले आहेत. महिला आयपीएलमध्ये पहिल्या पर्वात ५ संघ खेळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याच महिला आयपीएलसाठीचे मीडिया हक्कांचा लिलाव झाला. ज्यामध्ये Viacom18 ने यशस्वी बोली लावून मीडिया अधिकारांचे अधिकार संपादन केले आहेत. BCCI सचिव जय शाह यांनी ट्विट करून आयपीएल मीडिया हक्कांसाठी Viacom18 च्या विजयाची माहिती दिली.
महिला आयपीएलचे मीडिया हक्क Viacom18 ने जिंकले आहेत. BCCI आणि महिला संघावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. पुढील पाच वर्षांसाठी (२०२३ ते २०२७ ) ९५१ कोटींचा करार झाला आहे आणि प्रत्येक सामन्यासाठी ७.९ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. महिला क्रिकेटसाठी हे खूप मोठे आहे.
यापूर्वी, महिला महिला ट्वेंटी-२० चॅलेंज स्पर्धा खेळली गेली, ज्यामध्ये एकूण ३ संघ खेळले आणि सामन्यांची संख्या देखील ५ होती. स्टार स्पोर्ट्सला प्रत्येक सामन्यासाठी अडीच कोटी रुपये मोजावे लागत होते. सध्या, भारतीय महिलांच्या ट्वेंटी-२० सामन्याचा GRP 0.5 ते 0.7 आहे. त्यामुळे प्रत्येक आयपीएल सामन्यासाठी २५ टक्के हक्क ही वाजवी रक्कम असेल, असं जय शाहा यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button