अडीच वर्ष खूप चांगलं सहकार्य केलं, काही चुकलं असेल तर माफ करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
![अडीच वर्ष खूप चांगलं सहकार्य केलं, काही चुकलं असेल तर माफ करा : उद्धव ठाकरे](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/अडीच-वर्ष-खूप-चांगलं-सहकार्य-केलं-काही-चुकलं-असेल-तर.jpg)
मुंबई : अडीच वर्षांपूर्वी संकटाच्या काळात तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्रित आले. महाविकास आघाडीच्या सरकारने खूप चांगलं काम केलं. लोकांची सेवा केली. यादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांकडून खूप चांगलं सहकार्य लाभलं. अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिली. पण माझ्याच लोकांनी मला धोका दिला, याचं दु:ख आहे. काही चुकलं असेल तर माफ करा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठकीतून एक्झिट घेतली.
ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु असताना सलग दुसऱ्या दिवशी कॅबिनेट बैठक पार पडली. या कॅबिनेट बैठकीत तीन नामांतराचे मोठे निर्णय घेण्यात आले. औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानताळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेतला गेला. ठाकरे सरकारची ही शेवटची कॅबिनेट बैठक असल्याची चर्चा आहे. कारण उद्या सरकारला बहुमताची परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची मानली गेली.
कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावनिक
“संकटाच्या काळात तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्रित आले. महाविकास आघाडीच्या सरकारने खूप चांगलं काम केलं. लोकांची सेवा केली. यादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांकडून खूप चांगलं सहकार्य लाभलं. अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिली. पण माझ्याच लोकांनी मला धोका दिला, याचं दु:ख आहे. काही चुकलं असेल तर माफ करा”
कॅबिनेट बैठकीनंतर जयंत पाटील LIVE :
मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार
तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्रित आले
आतापर्यंत चांगलं सरकार चालवलं
सर्व सहकाऱ्यांना, मुख्य सचिवांना तसेच अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले
आपल्याच पक्षातील लोकांनी धोका दिल्याने त्यांना दु:ख
ही शेवटची कॅबिनेट आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही
कॅबिनेट बैठकीत राजीनाम्यावर त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाही