पिंपरी विधानसभा क्षेत्रात निघणार वीर सावरकर गौरव यात्रा
पिंपरी विधानसभेतील नगरसेवक ,कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक संपन्न
पिंपरी : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने महाराष्ट्रात सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये सावरकर गौरव यात्रा सुरू झाली असून त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी विधानसभा क्षेत्रातही रविवार ,दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी सायं ४,३० वाजता आकुर्डी, खंडोबा मंदिर ते विठ्ठल वाडी विठ्ठल मंदिरापर्यंत सावरकर गौरव यात्रा निघणार असल्याची माहिती सावरकर गौरव यात्रा पिंपरी विधानसभा प्रमुख श्री अमित गोरखे यांनी दिली.
यासंदर्भात आज आमदार उमाताई खापरे, श्री सदाशिव खाडे यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली आमदार उमा खापरे यांच्या चिंचवड येथील संपर्क कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सावरकर यात्रा विषयी दिशा ठरवण्यात आली ,त्याच बरोबर पिंपरी विधानसभा क्षेत्रातील सर्व नगरसेवक ,प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह सर्व नागरिकांनी यात सामील करण्यासाठी सी योजना आखण्यात आली. यात्रेचा मार्ग आकुर्डी खंडोबा मंदिर – ते आकुर्डी गाव – दत्त वाडी विठ्ठल मंदिर असा ठरविण्यात आला, या यात्रेत ढोल ताशा पथक झांज पथक वारकरी सांप्रदाय त्याचबरोबर बँड पथक सामील होणार असून या यात्रेचा शेवट दत्तवाडी येथील विठ्ठल मंदिरासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील व्याख्यानाने करावयाचे ठरले.
या बैठकीत आमदार उमाताई खापरे ,सावरकर गौरव यात्रा पिंपरी प्रमुख अमित गोरखे, भाजपाचे नेते सदाशिवजी खाडे, श्री राजू दुर्गे,यांनी मार्गदर्शन केले, बैठकीला शिवसेनेचे पिंपरी चिंचवड प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर,युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे ,श्री राजेश पिल्ले , मा नगरसेवक केशव घोळवे,मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, शर्मिला बाबर, सुजाता पालांडे ,आर एस कुमार त्यांचं बरोबर देवदत्त लांडे ,अतुल इनामदार ,सलीम शिकलगार, राजू बाबर ,समीर जावळकर, संजय मंगोडेकर,जयेश चौधरी,मदन गोयल, सुप्रिया चांदगुडे, कैलास कुटे, प्रकाश जवळकर, कोमल काळभोर, कोमल शिंदे, नेताजी शिंदे, नंदू भोगले, अण्णा गर्जे, देवदत्त लांडे,विजय शिनकर उपस्थित होते.