आळंदीत विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या महाराज कोकरे यांची तब्येत खालावली
पोलिस आणि प्रशासनाने बळजबरीने रुग्णालयात केले भरती
![Maharaj Kokre, who was on hunger strike for various demands in Alanya, became ill](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Alandi-News-780x470.jpg)
आळंदी : आळंदीत वारकरी संप्रदायाकडून उपोषण सुरू होते. यासाठी महाराज भगवान कोकरे हे उपोषणासाठी बसले होते. मात्र आज त्यांना पोलीस आणि प्रशासनाने बळजबरीने उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. सकाळी त्यांचा बीपी हाय तर शुगर लो झाली होती, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक स्थितीत आली होती. हे पाहता त्यांच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे होते. म्हणून दिघी पोलिसांनी उपोषण स्थळावर रुग्णवाहिका बोलावली. मात्र कोकरे मंचावरून जागचे हलायला तयार नव्हते.
समान नागरी कायदा, आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण द्यावं, इंद्रायणी नदीला प्रदूषणातून मुक्त करावं, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावा अशा विविध मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका त्यांनी आज ही घेतली. मात्र कोकरे महाराज यांची तब्येत पाहता, पोलीस आणि प्रशासनाने त्यांना थेट उचलून रुग्णवाहिकेत बसवलं. तिथून पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात त्यांना पुढील उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे.