breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

दुर्दैवी घटना : कासारवाडीत खोदलेल्या रस्त्याने घेतला बालकाचा बळी

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

रहदारीचा रस्ता सिमेंटीकरणासाठी महिनाभरापासून खोदून ठेवल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कासारवाडीत एका दोन वर्षांच्या मुलाचा नाहक बळी गेल्याची घटना घडली. त्यानंतरही महापालिका व पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई झाली नसल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे.
व्यंकटेश शंकर डोकडे (रा. मंजूळकर चाळ, कासारवाडी) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. मूळचा नाशिकचा असणारा व्यंकटेश सुट्टीसाठी आजोबांकडे आला होता. बुधवारी सकाळी घराजवळ तो खेळत होता. मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यावर भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने व्यंकटेशचा जीव गेला. तीन बहिणींनंतर झालेला एकुलता एक मुलगा म्हणून व्यंकटेश नात्यागोत्यात सर्वांचा लाडका होता. त्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ करण्यात येत आहे.
कासारवाडी-पिंपळे गुरव मार्गांवरील रस्त्यांचे सिमेंटीकरण सुरू आहे. त्यासाठी महिनाभरापासून रस्ता खोदून ठेवला आहे. अपुरी जागा व वाहनांची संख्या जास्त, त्यामुळे सततची कोंडी, त्यातून होणाऱ्या वादविवादांनी परिसरातील नागरिक वैतागले आहेत. नेहमीचा वाहतुकीचा रस्ता खोदाईमुळे बंद झाला. त्याची पूर्वसूचना देण्यात आली नाही. महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही पर्यायी व्यवस्था झाली नाही. त्यामुळे दिसेल त्या रस्त्याने (गल्लीबोळात) वाहने जाऊ लागली आहेत. अशाचप्रकारे मंजाळकर चाळीतील १२ फुटी रस्त्यावरून आरोपी वाहनचालक वेगाने जात होता. तेव्हा घराजवळ खेळणारा व्यंकटेश गाडीच्या चाकाखाली आला, त्यातच त्याचा जीव गेला. पुढील तपास सुरू असल्याचे भोसरी पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button