breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई-महाबळेश्वर मार्गावर पसरणी घाटात ट्रक उलटून दोन जखमी!
![Two injured as truck overturns in Pasrani Ghat on Wai-Mahabaleshwar road](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/truck-accident-new.jpg)
महाबळेश्वर |
वाई – महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळ सागवणाच्या लाकडांनी भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली. सध्या या परिसरात मागील काही दिवसांपासून अधूनमधून जोरदार पाऊस सुरू आहे. पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराच्या जवळून सागवानी लाकूड भरलेला मालट्रक जात असताना, चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि हा मालवाहू ट्रक उलटून घाटातील संरक्षक भिंतीवर जाऊन जोरात आदळला.
या अपघातामुळे घाटमाथ्यावरील संरक्षण भिंतीचे व माल ट्रकचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. संरक्षक भिंतीमुळे सुदैवाने ट्रक दरीत कोसळला नाही. ट्रकमधील दोन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाई पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.