breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र
Pune : खडकवासला धरणात बुडून बेपत्ता झालेल्या दोन मुलींचे मृतदेह सापडले
![Two girls who were missing after drowning in Khadakwasla dam in Pune district were found dead](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Khadakwasla-dam-in-Pune-780x470.jpg)
पुणे : पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणात बुडून बेपत्ता झालेल्या दोन मुलींचा मृतदेह सापडला आहेत. धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुलींपैकी सात मुलींना वाचवण्याच यश आलं आहे. मात्र दोन मुलींचे मृतदेह मिळाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कलमाडी फार्म हाऊस जवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागल्या. यावेळी स्थानिकांनी मुलींना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी सात मुलींना वाचवण्यात यश आले आहे.
हेही वाचा- ‘तुमचा पाळणा हलला नाही..’; रोहित पवारांचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला
हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. आतापर्यंत सात मुलींना वाचवण्यात आले आहे तर दोन मृतदेह सापडले आहेत.