ऐकावं ते नवलंच! टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात!
![Two bouncers are deployed for the safety of tomatoes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Bouncer-For-Tomato-780x470.jpg)
Bouncer For Tomato : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर १०० रूपये किलोच्या पुढे गेले आहेत. महाराष्ट्र, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये प्रचंड वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर वाराणसीमधील एका व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील शेअर केला आहे. यामध्ये एका भाजी विक्रेत्यांने टेमॅटोच्या साठ्याच्या सुरक्षेसाठी चक्क दोन बाऊन्सर तैनात केले आहेत.
संबंधित व्हिडीओ वाराणसीच्या लंका भागातील आहे. एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर तैनात केले आहेत. अजय फौजी असं या भाजी विक्रेत्याचं नाव आहे. तो समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी बाऊन्सर तैनात करण्याच्या त्याच्या कल्पनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा – ‘उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांनी एकत्र यावं’; महंत कबीरदास महाराज यांची मागणी
https://twitter.com/yadavakhilesh/status/1677998619616747520?
भाजी विक्रेते अजय फौजी म्हणाले की, बाऊन्सर तैनात केले आहेत, कारण टोमॅटोची दरवाढ तुम्ही पाहतच आहात. टोमॅटोसाठी मारामारी आणि लूटमार होत आहे. अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. आम्ही टोमॅटो मागवले आहेत.इथे मारामारी होऊ नये म्हणून आम्ही बाऊन्सर तैनात केले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे टोमॅटो खरेदी करताना लोकांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याच्या चर्चा माझ्या कानावर आल्या होत्या. आमच्या दुकानात आलेल्या लोकांनीही तसाच प्रयत्न केला. त्यामुळे मी ठरवलं आता बस झालं, त्यानंतर मी माझ्या दुकानात बाऊन्सर तैनात करण्याचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले.