Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘पुणे जिल्ह्यात नव्याने तीन महानगरपालिकांची निर्मिती’; अजित पवार

हिंजवडी, चाकण आणि फुरसुंगी परिसरासाठी तीन नव्या महापालिका

चाकणच्या वाहतूक समस्यांची पहाणी ; अधिकारी, पोलिसांना फटकारले

चाकण :  पुणे जिल्ह्यात नव्याने तीन महापालिका कराव्या लागणार असून चाकण नगरपरिषदेचे रूपांतर तातडीने महानगर पालिकेत करावे लागणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार शुक्रवारी चाकण येथे म्हणाले.

“ऑटोहब” असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीत पुणे नाशिक महामार्गावर तसेच चाकण शिक्रापूर रस्त्यावर नेहमीचीच वाहतूक कोंडी होते याबाबत स्थानिक सामाजिक संघटना यांनी आवाज उठवला त्याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (8 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने आजचा दौरा केला. रस्ते वाहतूक महामार्ग, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे, त्यासाठी निधी ही देणार आहे. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग केल्याशिवाय गत्यंतर नाही. चाकणकरांनी खूप त्रास सहन केला सहनशीलता दाखवली, पण आता यातून सुटका करु असेही ते म्हणाले.

चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. काहींना आवडेल न आवडेल, पण हे करावं लागेल, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची बाब आहे. पुणे नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकातूनच चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात तीन ते साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे या परिसरात रोज लाखाच्या आसपास वाहनं ये-जा करतात. या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर उभं आहे.

हेही वाचा –  अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न…

यावेळी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सोबतच बारामतीची तुलना चाकण सोबत करू नका असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महानगरपालिका झाल्यानंतर येतात विविध जागतिक बँका,केंद्र सरकारचा निधी आणता येतो .अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या महापालिका आल्या, ठाणे महानगरपालिका एकटी होती, त्यानंतर मुंबई महानगरपालिका झाली. मीरा भाईंदर महानगरपालिका झाली, जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली, तिथे पूर्वीपेक्षा आता वेगाचा विकास झाला आहे, वसई विरार महानगरपालिका झाली, त्या ठिकाणी सहा सात महानगरपालिका झाल्या. आपल्या जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड त्यानंतर वाकवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी या सर्व भागांमध्ये एक महानगरपालिका करावी लागेल, फुरसुंगी, उरुळी देवाची, तो सर्व परिसर एक महानगरपालिका नदी ओलांडून इकडे आलो पिंपरी चिंचवड तर बाकीच्या भागांमध्ये एक महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि जो सर्व वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल. साधारण महानगरपालिका करण्याच्या करता पाच लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते. या सगळ्या भागातील लोकसंख्या किती आहे. चाकणचा प्लॅन देखील आलेला आहे.

पोलीस आयुक्तांना अजितदादांनी खडसावले

मी सकाळी सहा वाजता दौरा करतोय, एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतायेत. मग पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल, असं अजित पवार म्हणाले. तसेच अजित पावर पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली. त्यामुळं अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केली आहे?, सगळी वाहतूक सुरु करा, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी आधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटोही दाखवले. व काही सूचना केल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button