Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

विमानातील ही सुविधा बंद! डीजीसीएचे निर्देश…

पुणे: मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रिक उपकरण चार्ज करण्यासाठी लिथियम बॅटरीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. परंतु यामुळे आगीच्या घटना घडत असून विमान प्रवासातील सुरक्षेला प्राधान्य देत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानात उड्डाणादरम्यान पॉवर बँक किंवा पोर्टेबल चार्जरचा वापर करून मोबाइल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आता विमानातील आसनाच्याच्या ‘ पॉवर आउटलेट’ द्वारेही मोबाईल, इलेक्ट्रिक उपकरणे चार्ज करण्यास बंदी घातली आहे.

हवाई उड्डाणांमध्ये या नियमाची तत्काळ कार्यवाही करण्यास सुरुवात झाली असून विमान कंपन्यांनी सुरक्षित प्रवास करण्यासाठी प्राधान्य देत प्रवासापूर्वी घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.

डीजीसीएने सुरक्षित अन् सुलभ हवाई प्रवास अंतर्गत स्वयं परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे विविध रिचार्जेबल उपकरणांमध्ये लिथियम बॅटरीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. विमानातही लिथियम बॅटरी वाहून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. पॉवर बँक, पोर्टेबल चार्जर आणि लिथियम बॅटरी असलेली तत्सम उपकरणे आग लावू शकतात आणि विमानात आग लागण्याचा धोका निर्माण करू शकतात. ओव्हरहेड स्टोरेज कंपार्टमेंटमध्ये किंवा कॅरी-ऑन बॅगेजमध्ये साठवलेल्या लिथियम बॅटरी लपलेल्या असतात, यांचा प्रवासात वापर झाल्यास आग लागणे, सुरक्षिततेला धोका पोहोचवणे असे अनुचित प्रकार घडत आहे. बहुतांशदा प्रवाशांना किंवा क्रू सदस्यांना सहजपणे व गोष्टी निदर्शनास येत नाही. सहजच या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. यामुळे धूर किंवा आगीचा शोध घेण्यास आणि प्रतिसाद देण्यास विलंब होऊ शकतो, ज्यामुळे उड्डाण सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, त्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने आदेश काढले आहे.

हेही वाचा –  लव्ह जिहाद कसा संपवणार?, सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितली त्रिसूत्री

सध्याच्या विमान सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पॉवर बँक आणि स्पेअर लिथियम बॅटरी फक्त केबिन बॅगेज (हँड लगेज)मध्ये घेऊन जाण्याची परवानगी आहे. चेक-इन बॅगेजमध्ये किंवा ओव्हरहेड बिनमध्ये ठेवता येणार नाही. उड्डाणादरम्यान पॉवर बँकचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे. जर एखाद्या उपकरणातून धूर, उष्णता किंवा असामान्य वास येत असेल, तर प्रवाशांनी तात्काळ केबिन क्रूला कळवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

जागतिक स्तरावर लिथियम बॅटरीमुळे आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. भारतातही ऑक्टोबरमध्ये इंडिगोच्या एका विमानात पॉवर बँकला आग लागल्याची घटना घडली होती. याच पार्श्वभूमीवर डीजीसीएने हा कठोर निर्णय घेतला आहे. विमान कंपन्यांना प्रवाशांना बोर्डिंग घोषणा आणि उड्डाणातील सूचनांद्वारे या निर्बंधांची आठवण करून देण्यास सांगितले आहे. तसेच, लिथियम बॅटरीशी संबंधित कोणतीही घटना तात्काळ डीजीसीएला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विमान कंपन्यांनी क्रू मेंबर्सना विशेष प्रशिक्षण देणे, सुरक्षा मूल्यांकन सुधारणे आणि आग प्रतिबंधक उपाय योजनांचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांनीही पूर्ण चार्ज केलेले उपकरणे घेऊन प्रवास करावा आणि पॉवर बँक सुरक्षितपणे हँड बॅगेजमध्ये ठेवावा, असे आवाहन डीजीसीएने केले आहे.

हा निर्णय विमान प्रवास आणखी सुरक्षित करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रवाशांनी या नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button