गजा मारणे टोळी सदस्यांना खंडणी प्रकरणी तेरा जणांना तीन दिवस पोलीस कोठडी
![Thirteen people have been remanded in police custody for three days in connection with the ransom case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/arrest-LOCKER-2.jpg)
वाई |
खंडणीच्या उद्देशाने आलेल्या गज्या मारणे टोळीशी संबंधित तेरा जणांची न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. गुरुवारी वाई पोलिसांनी पुणे महाबळेश्वर रस्त्यावर भीमनगर वाई तपासणी नाक्यावर सर्वांना ताब्यात घेतले होते. येथील जमिनींचे खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक प्रवीण दिनकरराव शिंदे यांनी यपोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिंदे यांचे साडू लक्ष्मण मारुती पार्टे (तायघाट ता महाबळेश्वर) यांचे नचिकेता हायस्कूल एकास चालविण्यास दिली होती.त्यावेळी या हायस्कुल चालकामुळे पुण्यातील एका इसमाची ओळख झाली होती. यावेळी संबंधिताने गजा मारणे टोळी साठी काम करत असल्याचे सांगितले होते. यानंतर या संबंधिताने प्रवीण शिंदे यांना फोन करून वेळोवेळी तुम्ही पाचगणी महाबळेश्वर परिसरात जमिनीचे मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले आहेत. याबद्दल तुम्हाला गजा मारणे टोळी साठी महिन्याला पंचवीस लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
आज संबंधित इसमाने आपल्या टोळी सदस्यांना बरोबर घेऊन वाई येथे घरी येऊन पैशाची मागणी केल्याप्रकरणी केली व पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. यामुळे भितीने प्रवीण शिंदे यांनी पोलिसांशी संपर्क साधून या टोळीच्या सदस्यांबाबत पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना माहिती दिली .यावेळी पोलिसांनी गजा मारणे टोळीशी संबंधित वाघु तुकाराम हळंदे ( जकातनाका,वारजे पुणे)गोरक्षनाथ माणिक शिळीमकर ,अमोल बंडू शिळीमकर ,विशाल चंद्रकांत शेळके,सौरभ तानाजी शिळीमकर,सचिन अंकुश शिळीमकर ( तांभाड ता.भोर )बालाजी कमलाकर कदम (दत्तवाडी, सिंहगड रोड पुणे)मंदार सुरेश बांदल,राहुल रामकृष्ण कळवणकर (दत्तवाडी सिंहगड रोड,पुणे)रोहन रमाकांत वाघ(विंग ता.खंडाळा) तुषार बाळासाहेब बदे (दत्तवाडी पुणे) आनंद तुळशीदास यादव (दत्तवाडी पुणे )विक्रम विलास समुद्रे वय (दत्तवाडी पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांकडून दप्तर अहवाल मागविला होता.त्यांच्या कडून एकोणीस लाख रुपये किमतीच्या तीन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांची तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर करत आहेत.
वाचा- #Covid-19: खासगी रुग्णालयांना १ मेपासून करोना लशींचा पुरवठा बंद