ठरलं! रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार या दिवशी होणार; शिंदे गटाच्या आमदाराने सांगितली तारीख
![Therlam! Rakhadlela cabinet expansion or day will happen; Shinde Gatachya MLA Sangitali date](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Eknath-Shinde-Devenvdra-Fadavis.jpg)
मुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत असल्यानं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत असल्यानं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत असल्यानं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत असल्यानं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडं सत्ताधारी आमदारांसोबतच विरोधकांच्या देखील नजरा लागल्या आहेत. दरम्यान आज शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 20 ते 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा अंदाज असल्याचं सिरसाट यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय सिरसाट
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला. मात्र आता येत्या 20 ते 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असा अंदाज असल्याचं सिरसाट यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणावरही दबाव नाही, माझ्याबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे.
संजय राऊत यांच्यावर टीका
दरम्यान यावेळी संजय सिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत हेच शिवसेना संपवण्याचे कटकारस्थान करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. एवढचं नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील संजय राऊत यांचा दबाव असल्याचं सिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान काल रात्री योगेश कदम यांचा अपघात झाला. गरज भासल्यास या अपघाताची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी सिरसाट यांनी केली आहे.