breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Pune : १५ ऑगस्टला जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर फडकणार तिरंगा

Pune : संपुर्ण देशात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्ववी वर्षाचा समारोप होणार आहे. यानिमित्त संपुर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याचवेळी पुणे जिल्ह्यातील १६ गड किल्ल्यांवर ध्वजारोहण होणार आहे. तर देशातील एकूण ७५ गडकिल्ल्यांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहे.

भारतीय लष्कराच्या सदर्न कमांडकडून देशातील ७५ किल्ल्यांवर तिरंगा ध्वज फडकावण्याची मोहीम हाती घेतली आहे. पुणे येथील सदर्न कमांडकडून ही विशेष मोहिम राबवली जात आहे. लष्कराचे जवान तिरंगा फडकवणार आहे. त्यासाठी १५ ऑगस्ट रोजी सकाळी सैन्य दलासोबत गिर्यारोहक आणि शिवप्रेमीही असणार आहे.

हेही वाचा – ‘मी या दिवशी मुंबईत, रोखून दाखवा’; दिग्दर्शक अमित जानी यांचे मनसेला चॅलेंज

पुणे जिल्ह्यांतील ‘या’ किल्ल्यांवर पडकणार तिरंगा

पुणे जिल्ह्यातील १५ ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे. शिवाजी महाराजाचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी येथेही ध्वजारोहण केले जाणार आहे. पुणे शहराजवळ असलेल्या सिंहगडावर तिरंगा जवानांच्या हस्ते फडकवण्यात येणार आहे. यासोबत रोहिडा, हडसार, जीवधन, चावंडगड, तोरणा, भोरगिरी, पुरंदर, राजगड, विसापूर, लोहगड, तिकोना, कोरीगड, तुंग या किल्ल्यांवर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

या जिल्ह्यातील किल्ल्यांवर फडकणार तिरंगा

पुणे जिल्ह्यातच नाही तर ठाणे, रायगड, अहमदनर कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ल्यांची निवड सदर्न कमांडकडून करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोपनिमित्त हा उपक्रम आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button