ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेअर बाजाराची सलग दुसऱ्या दिवशी पडझड सुरुच; पैसे काढून घेण्याकडे गुंतवणूकदारांचा कल

मार्केट सुरु होताच सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरुन ५७,१९०,०५ वर सुरु झाला

आंतरराष्ट्रीय बाजारानुरुप भारतीय शेअर मार्केटमधील परिस्थितीही जैसे थेच असल्याचं चित्र दिसत आहे. बुधवारी अमेरिकी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर स्टॉक फ्यूचर्समध्ये थोडी सुधारणा पहायला मिळाली होती. दुसरीकडे आज आशियाई मार्केटमध्ये संमिश्र ट्रेंड पहायला मिळत आहेत. बुधवारी कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेली वाढ आणि सध्याच्या पातळीपेक्षा महागाई आणखी वाढण्याची भीती असल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्याप्रमाणात विक्रीला प्राधान्य दिल्याने शेअर बाजार कोसळले. हाच विक्रीचा ट्रेण्ड आज म्हणजेच गुरुवारीही (२४ मार्च २०२२ रोजी) दिसत असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात घसरण झाल्याचं चित्र पहायला मिळालं.

मार्केट सुरु होताच सेन्सेक्स ४०० अंकांनी कोसळल्याचं निदर्शनास आलं. दिवसाचा कारभार सुरु झाला तेव्हा कालच्या तुलनेत आज शेअर बाजार ४०० अंकांनी खाली म्हणजेच ५७,१९०,०५ वर सुरु झाला तर निफ्टीही १५०.७ अंकांनी घसरण पहायला मिळाली. निफ्टी आज दिवसाच्या सुरुवातीला १७०९४.९५ वर राहिला. बुधवारी सेन्सेक्स ३०४ अंकांनी घसरून ५७,६८५ वर बंद झाला होता. तर निफ्टी ७० अंकांनी घसरून १७,२४६ वर बंद झाला होता.

बुधवारी डाऊ जोन्समध्ये (अमेरिकी शेअर बाजार) ४४९ अंकाची घसरण झाली आणि ३४,३५८.५० वर बंद झाला. तर अमेरिकेतील दुसरा महत्वाचा शेअर बाजार असणाऱ्या एस अॅण्ड पी ५०० इंडेक्सही १.२ टक्क्यांनी घसरला. हा शेअर बाजार ४,४५६.२४ वर बंद झाला. ‘नॅसडॅक’मध्ये १.३ टक्क्यांची घसरण झाली आणि १३,९२२.६० वर बंद झाला. बुधवारी कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा १२० डॉलरच्या पुढे गेल्या. यामुळे महागाई पुन्हा वाढण्याची भीती असल्याने गुंतवणूकदार पैसा काढून घेण्यास प्राधान्य देत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button