Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात गेल्या 24 तासात 15 हजार 817 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
![The number of corona victims in the state is at 32,29,547](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/1800x1200_coronavirus_1.jpg)
मुंबई – राज्यात गेल्या 24 तासात 15 हजार 817 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात नियमित सर्वाधिक वाढ होत आहे. त्यामुळे राज्य लॉकडाउनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.गेल्या 24 तासात 15 हजार 817 नवे रुग्ण सापडले तर 11 हजार 344 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 56 बाधितांच्या मृतांची नोंद झाली आहे.
आतापर्यंत 22 लाख 82 हजार 191 जणांना कोरोनाची लागण झाली तर 21 लाख 17 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 52 हजार 723 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 1 लाख 10 हजार 485 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.