breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

फटाक्यांसोबतच अगरबत्ती अन् कॉइलचा वापर टाळण्याचा राज्य सरकारने दिला सल्ला

मुंबई : राष्ट्रीय राजधानी आणि आजूबाजूच्या परिसरात वाढते प्रदूषणामुळे धोक्याची घंटा वाजली आहे. विषारी धुक्याच्या कहरामुळे दिल्ली-एनसीआरमधील सर्व भाग त्रस्त आहेत. विषारी धुक्याच्या वातावरणामुळे लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. घसा खवखवणे, डोळ्यात जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या लोकांना भेडसावत आहेत.

दिल्लीतील या वातावरणामुळे महाराष्ट्र राज्यातही प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. वायू प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम टाळण्यासाठी जनजागृती करणे: सामान्य नागरिक : वायू प्रदूषणाच्या संपर्कामुळे होणारा धोका खालील गोष्टींद्वारे कमी करता येणे शक्य आहे.

हेही वाचा – भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सैराट फेम आकाश ठोसर मैदानात 

संथ आणि रहदारी असलेले रस्ते, प्रदूषण कारी उद्योगांजवळील क्षेत्रे, बांधकाम पाडण्याची ठिकाणे, कोळशावर आधारित अशी उच्च प्रदूषण असलेली ठिकाणे, टाळा वीज प्रकल्प व वीटभट्टी इत्यादी ठिकाणी जाणे टाळा. एक्यूआय पातळीनुसार बाहेरील कामांचे वेळापत्रक तयार करा आणि खराब ते गंभीर एक्यूआय असलेल्या दिवसांमध्ये घरातच रहा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button