breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,96,340 वर

  • मुंबईत 2,877, पुण्यात 4,965 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढतोय आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ होतेय. राज्यात गुरुवारी दिवसभरात 25,833 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 12,764 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तसेच 58 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 23,96,340 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 53,138 इतका झाला आहे. तर आतापर्यंत 21,75,565 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 1,66,353 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा :-#Covid-19: करोनाच्या पहिल्या लाटेचा विक्रम मोडला; महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा उच्चांक

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात 2,877 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 1193 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,52,835 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,555 इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत 3,21,947 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 18,424 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात गुरुवारी 4,965 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,53,532 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 31 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 9,486 इतका झाला आहे. दरम्यान, काल आढळलेल्या 4,965 नव्या रुग्णांमध्ये 2,752 पुणे शहरातील आणि 1,296 पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button