पुढचे १०० वर्ष देवाभाऊ…; मंत्री नितेश राणेंचे मुख्यमंत्रीपदाबात विधान!

Nitesh Rane : राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री पदाबाबत अनेक विधाने नेतेमंडळी करताना दिसली होती. अजूनही मुख्यमंत्री पदाविषयीची वक्तव्य महायुतीमधील नेतेमंडळी करत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री पद न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात केली जात होती. तर दुसरीकडे भविष्यात विठ्ठलाच्या आशिर्वादाने अजित दादा मुख्यमंत्री होतील असे विधान अमोल मिटकरी यांनी केले होते. अशातच भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे मुख्यमंत्रीपदादाबाबत मोठं विधान केले आहे.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे वर्सोवा खाडीजवळील स्थानिक मच्छीमारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी देवाभाऊ हेच पुढील 100 वर्षे मुख्यमंत्री व्हावे, अशी प्रार्थना करण्याचे मच्छिमार बांधवांना सूचवले आहे. मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेला आहे. आपण मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका, कारण देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यामुळे देवाभाऊ पुढचे १०० वर्ष मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना करा, असा सल्ला त्यांनी कोळी बांधवांना दिला आहे.
मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळावा ही मागणी वर्षानुर्ष आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असल्याचे नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.
मी गुजरातवरुन थेट तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. आता कोणीतीही चिंता करू नका जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊ, असे आश्वासन नितेश राणे यांनी मच्छमारांना दिले आहे. यावेळी मध्ये मध्ये बोलणाऱ्यांना नितेश राणे यांनी झापले. मी ऐकणारा मंत्री नाही, ऐक आधी माझे मध्ये-मध्ये बोलायचं नाही असे म्हणत त्यांनी मध्ये मध्ये बोलणाऱ्यांना फटकराले.