पिंपळे सौदागरमधील नवीन रस्ता खचला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
![The new road in Pimple Saudagar is paved; Fortunately, a major accident was avoided](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Pimple-Saudagar-780x470.jpg)
पिंपरी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील छत्रपती चौकातील बांधकाम सुरू असलेला रस्ता खचला आहे. आज पहाटे ही घटना घडली आहे, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशनसनाने या घटनेची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
रस्त्यात असलेली पाणी पुरवठा लाईन व स्टॉम वॉटर लाईन देखील तुटली आहे. पहाटेच्या वेळी ही संपुर्ण घटना घडली आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शत्रुन्घ काटे, निर्मला कुटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी संबंधिक बांधकाम व्यावसायीक, मनपा अधिकारी, पाणी पुरवठा विभाग व पोलीस प्रशासनास सांगुन त्वरीत उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा – हा अलर्ट तुम्हाला सुद्धा आलाय का? वाचा नेमकं काय आहे प्रकरण..
दरम्यान, पोलीस व मनपा विभाग यांनी हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाईप लाईन व रस्ता दुरूस्ती करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे.