मुंबई ते उरण प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; रो-रो बोट सेवेसाठी जेट्टीचे काम सुरू
![The journey from Mumbai to Uran will take just a few minutes; Work begins on jetty for ro-ro boat service](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/ro-ro-boat.png)
रायगड | करंजा ते रेवस जलसेवेच्या धर्तीवर आता लवकरच मुंबईतील भाऊचा धक्का ते उरणच्या मोरा बंदरापर्यंत रो-रो बोट सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे वाहनांना सोबत घेऊन हा प्रवास काही मिनिटांत करणे सहज शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने उरण तालुक्यातील मोरा बंधरात जेट्टी उभारण्यासाठी सुमारे ५७ कोटी ५० लाख रुपयांची निविदा काढली असून निविदा मंजूर झाल्यानंतर पुढील दोन वर्षांत म्हणजे २४ महिन्यात हे काम पूर्णसंबंधित कंपनीला बंधनकारक असणार आहे.
सध्या या मार्गावर साध्या बोटीतून जलसेवा सुरू असून मुंबई ते उरण या प्रवासासाठी अर्धा तास लागतो. मात्र रो-रो बोट सेवा सुरू झाल्यावर प्रवाशांना आपली चारचाकी आणि दुचाकी वाहने रस्त्यावर न चालविता त्यांना सोबत घेऊन या बोटीतून प्रवास करता येणार आहे.विशेष म्हणजे मुंबई ते उरण हा प्रवास काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. रो-रो सेवा म्हणजे मोठ्या आकाराची अत्याधुनिक बोट सेवा आहे. वास्तविक मुंबई ते मोरा बंदर दरम्यान आठ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असतात. यातील बहुतेक प्रवासी हे नियमित प्रवासी असल्याने त्यांना त्याचा अधिक लाभ मिळणार आहे