breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ वेबसाईटवर पाहा निकाल

HSC Result 2024 | महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी २१ मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे.

आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा    –      ‘सनातन धर्म वाचवायचा असेल तर हिंदूंनी ५ मुलं जन्माला घालावीत’; देवकीनंदन यांचं विधान 

‘या’ वेबसाईटवर पाहा निकाल :

mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button