breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड : सर्व्‍हेक्षण कामाच्‍या मोबदल्‍यापासून शिक्षक वंचित

माहिती पाठवूनही राज्‍य सरकारकडून मोबदला नाही

पिंपरी-चिंचवड मधील दोन हजार शिक्षकांचा समावेश

पिंपरी | मराठा व खुल्या प्रवर्गाच्‍या सर्वेक्षणाच्‍या कामाच्‍या मोबदल्‍यापासून पिंपरी-चिंचवड शहरातील दोन हजार १२३ शिक्षक वंचित राहिले आहे. महापालिकेकडून राज्‍य सरकारला केलेल्‍या सर्व्‍हेक्षणाची, शिक्षकांची माहिती पाठवून दिली आहे. मात्र अद्याप वाटप न झाले नाही. मोबदला कधी दिला जार्इल या बाबत महापालिका प्रशासन देखील अनभिज्‍ज्ञ आहे.

२३ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दहा दिवसांच्‍या कालावधीत राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्षकांकडून मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरात २ हजार १२३ शिक्षकांची (प्रगणकांची) नियुक्ती केली. नियुक्‍त केलेल्‍या शिक्षकांनी सुमारे सहा लाखांहून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले. या माहितीच्या आधारे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे प्राथमिक काम पुर्ण करण्यात आले आहे. शिक्षकांनी शाळा सांभाळून सर्व्‍हेक्षणाचीही कामे केली आहेत. त्यांनी तारेवरची कसरत करत शहरात १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण केल्‍याचे शिक्षकांनी सांगितले.

हेही वाचा    –      समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाने आखला मास्टरप्लॅन

शहरात ६ लाख ५० हजार मिळकतीची नोंद आहे. तसेच, नोंद नसलेल्या १ लाखांपेक्षा अधिक मिळकत आहेत. दरम्यान, सर्वेक्षण करताना अनेक ठिकाणी घरे बंद असल्याने त्या घरांमधील कुटुंबांची माहिती गोळा करता आली नसल्‍याचे शिक्षकांनी सांगितले. ३१ तारखेपर्यंत सर्व्हेक्षण पूर्ण न झाल्याने २ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवली होती. त्यानुसार २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत सर्वेक्षणाला अॅप सुरू ठेवले होते. सर्व काम करूनही अद्याप मोबदला दिला नाही.

मोबदल्याचे स्वरूप…

मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी शिक्षकांना पहिल्या शंभर घरासाठी दहा हजार रुपये आणि तेथून पुढच्या एका घरासाठी शंभर रुपये तर इतर घरांसाठी दहा रुपये मोबदला देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले होते. प्रशिक्षणाचे ५०० रुपये मोबदला देण्यात येईल, असा अध्यादेश काढला होता. शहरात २ हजार १२३ कर्मचारी या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. मात्र मराठा सर्वेक्षण संपून एक महिना उलटला तरी, अद्यापपर्यंत खात्यावर मोबदला जमा झाला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button