‘आपलं हिंदू राष्ट्र पुढे गेलं पाहिजे, ते वाढलं पाहिजे’; स्वप्नील कुसाळे
![Swapnil Kusale said that our Hindu nation should move forward, it should grow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Swapnil-Kusale-1-780x470.jpg)
पुणे | ऑलम्पिक कांस्यपदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी पुण्यातील बालेवाडी-हिंजवडीतील दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी हिंदू राष्ट्र, हिंदू संस्कृती यावर भाष्य केलं. आपलं हिंदू राष्ट्र पुढे गेलं पाहिजे. ते वाढलं पाहिजे अस आवाहन स्वप्नील कुसाळे यांनी केलं आहे.
स्वुप्नील कुलाळे म्हणाले, पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवात सहभागी झालो आहे. आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. आपण सर्वजण जय श्रीराम म्हणतो, घोषणाबाजी करतो. त्या पुढे गेल्या पाहिजेत. हिंदू संस्कृती वाढली पाहिजे. आपण लहान मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, म्हणजे आपले हिंदू राष्ट्र आणखी मोठे होईल.
हेही वाचा – मोहन भागवत यांना पंतप्रधान मोदीं इतकी सुरक्षा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
दहीहंडी सारखे खेळ खेळण्यासाठी शरीरयष्टी महत्त्वाची आहे. उंचावर जाऊन हंडी फोडणे कौतुकास्पद आहे. त्यामागे मेहनत असते. तरुणांनी चांगला आहार घेतला पाहिजे. बाहेरचे खाऊ नये. घरातील जेवण करावे, वेळेत आणि पौष्टिक खावे, असे आवाहनही स्वप्नील यांनी केले आहे. यावेळी स्वप्नील यांचा नागरी सत्कार करून त्यांना पाच लाख रुपये देण्यात आले.