breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

नागपुरात आजपासून २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन

नागपूर – राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने ठिकठिकाणी कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यातच नागपुरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने याठिकाणी आजपासून २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली होती. दरम्यान, लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.

नागपुरात आजपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हेरायटी चौकात जाऊन लॉकडाऊनचा आढावा घेतला. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच नागपूर शहारीत सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच नागपूर शहरात अडीच हजार पोलीस तैनात करण्यात आले असून दुचाकीवर दोनजण फिरताना दिसल्यास आणि चार चाकी वाहनात दोन पेक्षा जास्त लोक असल्यास वाहन जप्त करण्यात येईल. तसेच जे व्यापारी या बंदमध्ये सहभागी होणार नाहीत, त्यांना बोलून समजवण्यात येईल. त्याशिवाय जो कोणी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले आहे.

वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,13,85,339 वर

शहरातील सीमा बंद, तपासणी करुन शहरात प्रवेश मिळेल.

शहरात 107 ठिकाणी नाकाबंदी.

2500 पोलीस कर्मचारी शहरात तैनात असतील.

राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या.

500 होमगार्ड.

रात्रीची 74 ठिकाणी नाकाबंदी.

शहरात पोलिसांचे 99 वाहने गस्त घालत राहणार.

विमान किंवा रेल्वे प्रवाशांना शहरात आल्यानंतर तिकीट दाखवावे लागेल.

विनाकारण शहरात येणाऱ्यांवर कठोर कारवाई.

मोटरसायकलवर फक्त एकजण जाऊ शकणार.

कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करू शकतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button