MPSC Exam | राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
![State Services Mains Exam 2022 General Merit List Announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/MPSC-Exam-780x470.jpg)
MPSC Exam | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात विनायक पाटील यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला. एमपीएससीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि संबंधित माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६३३ पदांसाठी घेण्यात आली होती. राज्यसेवेची आतापर्यंतची सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया असल्याने राज्यभरातील उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. एमपीएससीने जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये धनंजय बांगर यांनी राज्यात द्वितीय, तर सौरभ गावंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. एकूण १८३० उमेदवारांचा समावेश आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा यशस्वी
एमपीएससीच्या या निकालात राज्यातून विनायक नंदकुमार पाटील हा तरूण प्रथम आला आहे.धनंजय वसंत बांगर हा तरूण दुसरा आला आहे आणि सौरव केशवराव गावंडे हा तरूण तिसरा आला आहे.मुलींमध्ये अनिता विकास ताकभाते या तरूणीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दिपा चांगदेव जेधे ही दुसरी आली आहे. सोनाली अर्जुनराव म्हात्रे ही तरूणी तिसरी आली आहे. एमपीएससीच्या या निकालाने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.