भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
मा. नगरसेवक मित्र परीवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
![State member of BJP former corporator Adv. Moreshwar Shedge's birthday was celebrated with various social activities](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Moreshwar-Shedge-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवडः भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवसनिमित्त चिंचवड प्रभाग क्रमांक 18 मधील सन्मानिय जेष्ठ नागरिकांचा सत्कार, माझी लाडकी बहिण योजना व नव मतदार नोंदणी अभियान आणि अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमांचे नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे मित्र परीवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पिं.चिं.नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, जेष्ठ नेते महेश कुलकर्णी, जेष्ठ नगरसेवक प्रदेश सदस्य चंद्रकांतआण्णा नखाते, नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, राजाभाऊ दुर्गे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सदस्य गतीराम भोईर, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी, जेष्ठ नेते रविंद्रजी देशपांडे, जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रमेशची इनामदार, नंदकुमार मुरडे व प्रयास महीला ग्रुपच्या अध्यक्षा शोभाताई निसळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जेष्ठ नागरिकांना पावसाळ्यात उपयुक्त पडतील अशा भारतीय बनावटीच्या छत्र्या व उबदार शालींचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते माजी सरपंच पै. ज्ञानेश्वर शेडगे, मा.नगरसेवक सुरेश भोईर, राजाभाऊ गोलांडे, सामाजिक समरसता मंचाचे पंजाबराव मोंढे, भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य अजित कुलथे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते खंडूशेठ चिंचवडे, भाजपा शहर मा.उपाध्यक्ष दत्ताभाऊ चिंचवडे, पाटीलबुवा चिंचवडे, शेखरआण्णा चिंचवडे, कामगार नेते विश्वास राऊत, सुभाष मालुसरे, आण्णासाहेब मगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गुलाब बिरदवडे, ब्राम्हण महासंघाचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष महेश बारसावडे, भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, ओबीसी मोर्चाचे शहर भाजपा सरचिटणीस प्रशांत आगज्ञान, प्रभाग अध्यक्ष विठ्ठल भोईर, प्रदीप सायकर, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सायकर, पांडूरंग चिंचवडे, धनंजय शाळीग्राम, राघूशेठ चिंचवडे, चापेकर उद्यान जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रमेश देव, शामकांत खटावकर काका, चिंचवड जेष्ठ नागरिक संघाचे गोपाळ भसे, सुरेश जोशी आदी प्रमुख पदाधिकारी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन भोगले यांनी तर अजित कुलथे यांनी आभार मानले.