Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अ‍ॅपआधारित ई-टॅक्सी सेवेसाठी राज्य शासनाचा पुढाकार; परिवाहन मंत्री सरनाईक यांची माहिती

मुंबई : अ‍ॅपआधारित ई-टॅक्सी सेवा महाराष्ट्रात बंद असली तरी ती कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आता राज्य सरकारच्या परिवाहन मंत्रालयाकडून यासाठी हिरवा कंदील दाखवतानाच, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी शासनाकडेच ॲप सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. राज्य सरकार मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅपआधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असल्याचेही प्रताप सरनाईकांनी नमूद केले.

केंद्र सरकारच्या अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वानुसार या ॲपची नियमावली अंतिम टप्यात असल्याचेही सरनाईकांनी सांगितले आहे. सरनाईकांनी खाजगी कंपन्यांना धारेवर धरत म्हटले की, सध्या खाजगी संस्था अनाधिकृत ॲपच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात. त्यासाठी त्या कंपन्या चालक व प्रवासी यांची लूट करीत आहेत. सरकारकडे यंत्रणा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनाने असे ॲप विकसित केल्यास त्याचा फायदा प्रवाशांच्या बरोबर चालकांना देखील होईल. या संदर्भात ५ ऑगस्टला मंत्रालयात संबंधितांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सरनाईक बोलताना म्हणाले.

हेही वाचा –  बुद्धिबळ विश्वचषक जिंकणाऱ्या दिव्या देशमुखचा महाराष्ट्र सरकार करणार सन्मान

प्रताप सरनाईकांनी सांगितले की, प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा, टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित राहणार नाहीत. परिवहन विभागाच्या सहकार्याने या प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात येतील. सरकारमान्य या ॲपला जय महाराष्ट्र, महाराईड, महायात्री किंवा महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मान्यतेनेच सदर शासकीय ॲप सुरु केले जातील. या उपक्रमाअंतर्गत अ‍ॅप विकसित करण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी आणि मित्र या संस्थेसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश करण्यात येणार असल्याचे देखील परिवाहनमंत्री सरनाईक म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button