चिखली येथे सोन्या तापकीरची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
![Chikhli, Sonya Tapkir, Bhardivas, Shot dead,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/chikhli-Sonya-Tapkir-780x470.png)
पिंपरी । पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये गोळ्या झाडून मृत्यूची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. किशोर आवारे हत्या प्रकरणाची आग अजूनही शमली नाही तोच आज दुपारी अडीचच्या सुमारास चिखली येथे भरदिवसा एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चिखली ताळगाव कमानीजवळ सोन्या तापकीर (वय 20) या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपी दुचाकीवरून पळून गेला.
सोन्या तापकीर असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिरगावच्या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची गेल्या आठवड्यात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
आज चिखली येथे खुनाची आणखी एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. सोन्या तापकीर याची चिखली गावात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. जखमी तापकीरला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन विभागात खळबळ उडाली आहे. बंदुका आणि कोयत्याचे वाढते साम्राज्य, दहशतीमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.