सोमनाथ सूर्यवंशीमृत्यूप्रकरणी आंबेडकरी अनुयायींकडून महाराष्ट्र बंदची हाक
परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील मैदानात आज धरणे आंदोलन
![Somnath Suryavanshi, Death, Ambedkar, Follower, Maharashtra, Band, Call, Parbhani, city, district, office, field, dam, agitation,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/somnath-suryavanshi-780x470.jpg)
परभणी : परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीमृत्यूप्रकरणी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आंबेडकरी अनुयायींकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये असताना काल सकाळी सोमनाथ सूर्यवंशीना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. एका माथेफिरूने 10 डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती, आणि त्याविरोधात 11 तारखेला आंदोलन करण्यात आलं होतं.
त्याच आंदोलनादरम्यान दगडफेक तसेच तोडफोड झाली होती. दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती. 14 तारखेला त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. मात्र काल सकाळी (15 डिसेंबर) सोमनाथ सूर्यवंशी यांचा सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर आज आंबेडकरी अनुयायांकडून आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच अनुयायींनी जिल्हा बंद पुकारला आहे. बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील मैदानात आज धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.