Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस ३१ ऑगस्टपर्यंत रद्द
![Solapur-Pune-Solapur Hutatma Express canceled till 31st August](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/rail-2.jpg)
सोलापूर – सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस ३१ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे. दुहेरीकरणाच्या कामामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे ब्लॉकचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकमुळे हा रद्दचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील भालवणी-भिगवण सिंगल लाईन सेक्शनमध्ये दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम दिवसरात्र चालणार असल्याने या मार्गावरून जाणारी हुतात्मा एक्सप्रेस ३१ ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.