मोठी बातमी! मुंबईतल्या विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडेसहा टन चांदीच्या विटा

मुंबई | पुणे शहरात काही दिवसांपूर्वी एक व्हॅन पोलिसांनी पकडले होते, त्यामध्ये दागिने व मौल्यवान वस्तू होत्या. त्यानंतर, आता मुंबईत चांदीच्या वीटांनी भरलेली व्हॅन पोलिसांनी पकडली आहे. विकोळी पोलिस व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेल्या कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या वीटा एकूण साडेसहा टन इतक्या आहेत.
व्हॅनमधील या चांदींच्या विटांची किंमत करोडोंच्या घरात आहे, या वीटा ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून मुलुंडमधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती आहे. पोलिसांना आढळलेल्या या वीटा अधिकृत असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मात्र, निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स आणि पोलिसांकडून याचा अधिक तपास केला जात आहे.
हेही वाचा – महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना माजी सैनिकांचा पाठिंबा
दरम्यान, पोलिसांकडून सर्वच मतदारसंघात वाहनांवर व अवैध वाहतुकीवर करडी नजर असून अनाधिकृतपणे पैशांची वाहतूक करण्यात येत असल्यास कारवाई केली जात आहे.




