श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना ६६ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Warna-780x470.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Warna-2-1024x256.jpg)
सांगली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
परदेशातील साखर मालाची बाजारपेठ मिळवण्यासाठी वारणा सहकारी साखर कारखान्याच्या रिफायनरी मध्येही आधुनिक बदल केला आहे.त्याचबरोबर सभासदाभिमुख कारभार, सुयोग्य नियोजन आणि कणखर प्रशासन पदाधिकारी,कर्मचारी,सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बहुमोल योगदानावर कारखान्याची घोडदौड सुरू असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले…
देशातील एकमेव बगॅस कोजन प्रकल्प आता वारणा कारखान्याच्या मालकीचा झाला आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासनाशी आणि कायदेशीर बाबींशी झुंज देत अखेर हा प्रकल्प वारणा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा करण्यात यश आले. प्रकल्पातून मिळणारे उत्पादन हे कारखान्याला नवे आर्थिक पाठबळ देणारे असेल. त्याचबरोबर कारखान्याला सुमारे १००० टॅक्ट्रर वाहनधारकांचेही करार झाले आहेत. यंदाच्या हंगामामध्ये वारणा सहकारी साखर कारखाना १६ लाख में टन एवढे विक्रमी गाळप करणार असल्याचा विश्वास आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी व्यक्त केला…
गेल्या हंगामातील वाहनतळातील जॅमिंगच्या अडचणी लक्षात घेता चालू हंगामात कारखान्याने योग्य ते नियोजन करत गव्हाण, क्रशिंग स्पिड वाढवण्यासाठी सर्व आवश्यक यंत्रणा अद्यावत आणि सुसज्ज केली आहे. फेब्रुवारी – मार्च महिन्यातील साखर उताऱ्याचे प्रमाण व ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील साखर उताऱ्यातील तफावत कमी करण्यासाठी सभासदांनी योग्य ती भूमिका घेण्याचे आवाहन केले…
“मी वारणेचा आणि वारणा माझी” याच सभासदांच्या सदिच्छा सर्व अडचणीतून बाहेर पडताना अगदी आपल्या शुभंकरांणी आम्हा सर्व संचालक मंडळाला एक नवा आत्मविश्वास देऊन जातात. त्याच जोरावरच आज वारणा कारखान्याने “रुणमुक्ताय नमः” चा दृढनिश्चय केला आहे. आगामी अडीच वर्षांमध्ये कारखाना कर्जमुक्त करण्याचा संकल्प सुध्दाही याच तळमळीने आपण सर्वांनी पूर्णत्वास नेण्याचा आहे…
वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखाना कार्यक्षेत्रातील केखले व मनपाडळे गावांतील ऊस अन्यविल्हेवाट न करता सर्व शेतकऱ्यांनी 100% नियमित सर्व ऊस वारणा कारखान्याकडे पाठविल्याबद्दल शेतकऱ्यांचा सत्कार केला…
केखले गावातून कृष्णात बळवंत पाटील,गणपती रामचंद्र पाटील,आनंदा पांडुरंग मगदूम,आनंदा बंडू पाटील,तानाजी सदाशिव निकम व मनपाडळे गावातून भारत बापूसो सूर्यवंशी,सर्जेराव बापू जगताप,धोंडीराम किशाप्पा सूर्यवंशी,मारुती सिताराम जाधव-पाटील,दत्तात्रय रामचंद्र सुर्यवंशी या सर्व संबंधितांच्या प्राथमिक स्वरुपात जेष्ठ व प्रतिष्ठीत ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला…
तसेच वारणा सहकारी साखर कारखान्याला गेली ५० वर्षीपासून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांचाही सत्कार करण्यात आला.मांगले गावातून गेली ५५ वर्षे जयसिंग आकाराम पाटील,मनपाडळे गावातून गेली ५३ वर्षे विलास तुकाराम पाटील व सागांव गावातून गेली ५१ वर्षे स्थानिक टोळीने वारणा सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा केल्याबद्दल त्यांचा वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला…
यावेळी विषय पत्रिकेवरील १ ते १० विषय टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर करण्यात आले. आभार व्हा.चेअरमन प्रतापराव बाळकृष्ण पाटील यांनी मानले. यावेळी सन्मानिय संचालक,कारखान्याचे कार्यकारी संचालक,सर्व पदाधिकारी,सर्व विभाग प्रमुख,कर्मचारी व बहुसंख्य सभासद उपस्थित होते….