breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! चोरीच्या हेतूने वृद्ध दाम्पत्याचा खून, तीन आरोपींना अटक

राहाता |

तालुक्यातील कोऱ्हाळे येथे रात्री गाढ झोपेत असतानाच डोक्यात फावडे मारून वृद्ध दाम्पत्याची निर्घृनपणे हत्याकांड हे आरोपींनी चोरीच्या उद्देशाने केले होते. या हत्याकांडासंदर्भात ३ आरोपींना अवघ्या चार दिवसात अटक करण्यात यश आले असून त्यांनी खुनाच्या गुन्ह्यची कबुली दिली. ही कामगिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज मंगळवारी दुपारी लोणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. बेंद्रया उर्फ देवेंद्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले ( वय २८, राहणार पढेगाव तालुका कोपरगाव), दिलीप विकास भोसले ( वय १९ ) व  आवेल विकास भोसले ( वय २०, दोघेही  राहणार जवळके तालुका कोपरगाव )  असे अटक करण्यात आलेल्या ३ आरोपींचे नावे असून मायकल चव्हाण व डोंगऱ्या चव्हाण ( दोघेही राहणार लक्ष्मीनगर कोपरगाव ) हे दोन आरोपी फरार आहेत. आरोपी बेंद्रया उर्फ देवेंद्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले  याच्या विरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात दोन जबरी चोरीचे, बेलवंडी पोलीस ठाण्यात दरोडा व फसवणूक तर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात घरफोडी असे चार गुन्हे दाखल असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले.

तालुक्यातील कोऱ्हाळे गावात दि. २५ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शशिकांत चांगले (वय वर्षे ६० व सिंधुबाई चांगले वय वर्षे ५० ) या वृद्ध दाम्पत्याची हत्या डोक्यात फावडे मारून हत्या करण्यात आली होती. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी वरिष्ठांच्या सुचनेनुसार स्वतंत्र पथके तयार करून या गुन्ह्यचा तांत्रिक बाबीच्या अधारे तपास केला. कटके यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्हा बेंद्रया उर्फ देवेंद्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले याने त्याच्या साथीदारांसह केला या आरोपीस सापळा लावून पाठलाग करून त्याच्यासह दोघांना पकडण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले. त्याने सदर गुन्हा आपल्या साथीदारांसह चोरीच्या उद्देशाने केल्याची कबुली दिली असल्याची माहिती मनोज पाटील यांनी दिली. या आरोपींकडून चोरी केलेला किती मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याची ठोस माहिती पाटील यांना देता आली नाही. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उप अधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button