breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
धक्कादायक! यवतमाळमध्ये चार जणांचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू
![Shocking! Six die after drinking sanitizer in Yavatmal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/poison-drink.jpg)
यवतमाळ |
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे प्रचंड वेगाने प्रसार होत असून, राज्य सरकारने संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन लागू केला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दारु विक्रीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यातूनच यवतमाळमध्ये भयंकर घटना घडली आहे. दारूची तलफ झाल्यानंतर काही जणांनी सॅनिटायझरचं प्राशन केलं. यात चार जणांचा मृत्यू झाला असून, चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे.
वाचा- #Covid-19: करोना उपचारासाठी ‘झायडस कॅडिला’चे औषध प्रभावी