Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
धक्कादायक! स्वतः विषप्राशन करून महिलेने ५ महिन्याच्या मुलीला पाजले विष
![धक्कादायक! स्वतः विषप्राशन करून महिलेने ५ महिन्याच्या मुलीला पाजले विष](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/धक्कादायक-स्वतः-विषप्राशन-करून-महिलेने-५-महिन्याच्या-मुलीला-पाजले-विष.jpg)
परभणी |
एका महिलेने स्वतः विषप्राशन करून आपल्याच ५ महिन्याच्या मुलीला महिलेने विष पाजल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील रवळगाव येथे घडली आहे. ज्योती दत्तात्रय फुलपगारे विषप्राशन केलेल्या ३० वर्षीय महिलेचे नाव आहे. महिला आणि मुलीची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर परभणी येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
- असा घडला सर्व प्रकार…
मिळालेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील रवळगाव येथील ३० वर्षीय विवाहित महिला ज्योती दत्तात्रय फुलपगारे यांनी विषारी औषध प्राशन केले. महिलेने इतक्यावरच न थांबता आपल्या ५ महिन्याच्या मुलीला देखील विषारी औषध पाजले सदरील घटना गुरुवार २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर महिला आणि मुलीला उपचारासाठी सेलु उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करू पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
- मुलीची प्रकृती गंभीर…
दरम्यान, त्या ५ महिन्याच्या मुलीची प्रकृती गंभीर असून परभणी येथे उपचार करण्यात येत आहे. महिलेने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अजूनपर्यंत सदरील घटनेची पोलिसांमध्ये नोंद करण्यात आलेली नाही.