IAS अधिकाऱ्याच्या राजीनाम्याने खळबळ
![Sensation of resignation of IAS officer](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Sensation-of-resignation-of-IAS-officer.jpg)
अमरावती | जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासीबहुल भागात प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत असणारे वैभव वाघमारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा केंद्रीय सचिवांकडे पाठवल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे मेळघाटचे नाव देशाच्या नकाशावर चर्चेत होतं. अशातच २०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी वैभव वाघमारे यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. वैभव वाघमारे यांनी राजीनामा दिला ही माहिती त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून समोर आली आहे.
भारतीय प्रशासनिक सेवेतील २०१६ च्या बॅसचे अधिकारी असलेले वाघमारे हे गेल्या काही वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. कार्यालयात बसून काम न करता त्यांनी सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करण्यावर या काळात भर दिला. सोबतच वैभव वाघमारे यांनी सुमारे तीनशे गावांमध्ये मोहन फुल बँक नावाची संकल्पना रुजवली यातूनच चीन प्रोजेक्ट अंतर्गत न्यूक्लियर बँकेमार्फत स्थानिक गरजा पूर्ण करण्यावर भर देण्याची संकल्पना पुढे आणली होती.
टिटंबा येथील आदिवासी आश्रम शाळेत आठ एप्रिलला त्यांनी आदिवासी विकास योजनांची माहिती देण्यासाठी मेळघाट दूध मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी आदिवासी बंधू-भगिनींशी संवाद साधला होता. मेळघाटची समस्या हे दोन वेळचे जेवण आहे. तुमची ही गंभीर समस्या फक्त तुम्हीच अनुभवता. ही समस्या सुटण्यासाठी तुमच्यातील व्यक्तींनी अधिकारी होणे गरजेचे आहे. ज्या दिवशी ही समस्या सुटेल त्या दिवशी मेळघाटचा खरा विकास होईल, असे वैभव वाघमारे यांनी म्हटले होते.
वैभव वाघमारे यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून करोना काळात सुद्धा उल्लेखनिय कार्य केले होते. त्यांनी काही काळ बंदिस्त होऊन वाचनावर भर दिला. प्रशासनिक सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय स्वतः घेतल्याचं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. नोकरीचा राजीनामा देण्याचे धाडस यामागे कारण आणि प्रेरणा असलेल्या तथागतांचे आभार मानले आहे. एसआरएस आय आर एस अशा तीन सर्वोच्च मानाच्या पदावरील तीन वर्षाच्या काळात जीवनाचा इतका समृद्ध अनुभव दिला जो मिळवण्यासाठी वीस तीस वर्षाचा कालावधी लागला असता. आयएएस देशातील सर्वोत्तम नोकरी आहे. पण ते एखाद्याला आवडेलच व त्याने ती आयुष्यभर केलीच पाहिजे ते आवश्यक आहे का? असा प्रतिप्रश्न सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर आपला राजीनामा देताना केला आहे.