Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु होणार

मुंबई – कोरोनामुळे  मागच्या बऱ्याच महिन्यापासून बंद असलेल्या राज्यातील शाळा  आता सुरु होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्यास मान्यता दिली आहे. कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु होणार आहेत. येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु होतील. शिक्षण विभागाने  मुख्यमंत्री कार्यालायला प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजुर झाला आहे. मध्यंतरी ग्रामाीण भागातील  शाळा सुरु झाल्या होत्या. पण कोरोनाची दुसरी लाट आली आणि शाळा पुन्हा बंद झाल्या.

मागच्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर काही इयत्ता, वर्ग सुरु झाले होते. पण दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा वर्ग बंद झाले. विद्यार्थी मागच्या दीड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. १७ ऑगस्टला शाळा सुरु करण्याचा मानस होता. पण तो निर्णय रद्द झाला होता.

बहुतांश ठिकाणी लसीकरण आता झालेलं आहे. शिक्षकांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शिक्षण खात्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

“खरंतर एक महिना आधी शाळा सुरु करायला पाहिजे होत्या. आता त्या सुरु होतील. जिल्हाधिकाऱ्याला त्या भागातील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार असेल. मला वाटतं आता महाराष्ट्रात अतिशय चांगलं वातावरण आहे. कोरोनाचा विषय संपल्यात जमा आहे. नेमका आता निर्णय काय झालाय, तो कुठल्या वर्गासाठी आहे याची कल्पना नाही” असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button