“सत्ताधारी पक्षाचा सीमावादाचा ठराव अत्यंत बुळचट आहे”; संजय राऊत
![Sanjay Raut said that the ruling party's resolution on borderism is very stupid](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/sanjay-raut-4-780x470.jpg)
फडणवीसांना भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करावी लागतेय हे दुर्दैवी
पुणे :
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्षात असताना त्यांनी विधानसभेचा वापर भ्रष्टाचाराच्या विरोधात केला. विरोधी बाकावर असताना भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणं अत्यंत समर्थपणे लावून धरणाऱ्या फडणवीसांना आता भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करावी लागतेय हे दुर्दैवी आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीसांना सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराची प्रकरणं बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहेत. आमच्यासाठी यावेळेला सीमा प्रश्नावर ठराव महत्वाचा आहे. बॉम्बस्फोटात सीमाप्रश्नावरचा ठराव वाहून जाऊ नये, म्हणून आज आम्ही त्यावर फार बोलणार नाहीत.., अंसही संजय राऊत म्हणाले.
सीमावादाचा प्रश्न सुटेपर्यंत तो प्रदेश केंद्रशासित करावा, हा मुद्दा काल उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत मांडला. त्यानंतर आज सरकार या मुद्द्यावरून ठराव मांडणार आहे. मात्र हा ठराव अत्यंत बुळचट आहे, असा टोला संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला आहे.
अब्दुल सत्तार यांनी 36 एकर जमीन वाटली, कृषी महोत्सवासाठी काही कोटींची ठेकेदारी केली. मुख्यमंत्र्यांनी एनआयटीचे 16 भूखंड ज्या पद्धतीने वाटले गेले. संजय राठोडांवरही आरोप आहेत पण यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. आत्तापर्यंत एवठे पक्षपाती विधानसभा अध्यक्ष पाहिले नाहीत. फडणवीस यांनी आपला पूर्व इतिहास लढण्याचा विसरू नये. भविष्यात या लढ्यात त्यांना यावच लागणार आहे. भ्रष्ट सरकारचं ओझं घेऊन फार काळ सरकार चालवता येणार नाही, असंही राऊत म्हणाले.