breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’? बॅनरमुळे जोरदार चर्चा!

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड झळकले होते. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याही समर्थकांनी भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स लावले आहेत. या बॅनरची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर उर्से टोल नाक्यावर हे बॅनर्स लागले आहेत. रोहित पवार यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे बॅनर्स आहेत. यावर रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. त्यामुळे या बॅनर्सची जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – ‘२०२४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील’; भाजप आमदारांचं विधान

दरम्यान, यापुर्वी राज्यातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स लागले आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, पंकजा मुंडे, जयंत पाटील, राज ठाकरे या नेत्यांचा समावेश आहे. मात्र रोहित पवार यांचे बॅनर्स लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button