breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

‘दूरदृष्टी, अथक परिश्रम, दृढ निश्चय ही यशाची ‘त्रिसूत्री”; रितू फोगाट

'टेडेक्स-पीसीसीओईआर' कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद

पिंपरी : आजच्या स्पर्धात्मक युगात यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांवर ताणतणाव असतात. अशा परिस्थितीचा विचार करता जीवनात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी, अथक परिश्रम, ध्येय प्राप्तीसाठी दृढनिश्चय या त्रिसूत्रीचा अवलंब विद्यार्थ्यांनी करावा. तरच पुढील आयुष्यात यशोशिखरावर पोहचाल, असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू रितू फोगाट यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च च्या (पीसीसीओइआर) वतीने ‘टेडेक्स – पीसीसीओईआर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मध्यप्रदेश पोलीस दलातील अधिकारी डॉ. वरूण कपूर, अभिनेता शंतनू रांगणेकर, आरजे सोहम शहाणे, कॅलिस्थेनिक्स सेलिब्रिटी ट्रेनर कर्स्टन वरेला, शिवव्याख्याते नामदेवराव जाधव यांनी ‘द ह्युमन अल्गोरिदम’ मानवी मानसिकतेचा एक मनमोहक शोध, विचार, भावना आणि निर्णयक्षमता यावर मार्गदर्शन केले. उद्योजक अजिंक्य काळभोर, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, डॉ. शितलकुमार रवंदळे, डॉ. राहुल मापारी, प्रा. त्रिवेणी ढमाले आदी उपस्थित होते.

हेही वाचा – यशस्वी जीवनासाठी अविरत संघर्ष हाच पर्याय!

डॉ. वरूण कपूर यांनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात सायबर क्राईमचा वाढता धोका, त्याव्दारे होणारे गुन्हे आणि सर्वसामान्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. नामदेवराव जाधव, सोहम शहाणे, कर्स्टन वरेला, शंतनु रांगणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, स्वागत डॉ. राहुल मापारी यांनी तर प्रा. त्रिवेणी ढमाले यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button