breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण सुरू, ‘या’ तारखेपासून करता येणार एसटीचे बुकींग

Ganesh Utsav 2024 | गणपतीच्या आगमनाला केवळ दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक ४ जूलैपासून खुले होणार आहे.तसेच गणेशोत्सव काळात जादा एसटी फेऱ्याही चालवण्यात येणार असून परतीचे आरक्षण सुद्धा गुरुवारपासूनच सुरु होणार आहे.

गणेशोत्सवासाठीचे जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रवाशांना वैयक्तिक आरक्षणासह समूह आरक्षणही एकाच दिवशी करता येणार आहे.सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. त्यासोबतच मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणाहून २ आणि ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवासाठीचे जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा    –      ‘सातारा शिरवळ येथे आयटी हब होणार तर पुसेगाव रस्त्यालगत औद्योगिक वसाहत’; उद्योगमंत्री उदय सामंत 

कोकणात गणेशोत्सवासाठी वाड्या-वाड्यांमध्ये संपूर्ण एसटीचे आरक्षण करण्याची पद्धत आहे. यामुळे वैयक्तिक आरक्षणासह समूह आरक्षण एकाच दिवशी प्रवाशांना करता येणार आहे. महामंडळाच्या आरक्षण केंद्रासह मोबाइल अॅप आणि महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवाशांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी गाड्यांचे आरक्षण ६० दिवसआधी खुले करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यापूर्वी ३० दिवस आधी गाड्यांचे आरक्षण करण्याची मुभा होती. रेल्वेगाड्यांचे आरक्षण १२० दिवसआधी करता येते. उत्सवकाळातील गाड्यांना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी आरक्षण करूनच सुखरूप प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button